Sunday, February 7, 2010

खेळ मांडला - Khel Mandala

खेळ मांडला - Khel Mandala
गायक:- अजय गोगावले

तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सर ना ह्यो भोग कशापाई
हरवली वाट दिशा आंधरल्या दाही

ववाळूनी उधेळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला

खेळ मांडला...खेळ मांडला ....
खेळ मांडला...देवा...खेळ मांडला

सांडली गा रितभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीवगा.. खेळ मांडला
दावी देवा पैल पार.. पाठीशी तू र्हा उभा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात.. खेळ मांडला

हे... उसवलं गणगोत सारं
आधार...कुणाचा न्हाई
भेगाडल्या भुई पाई जीनं..
अंगार जिवाला जाळी..

बळ दे झुंझायाला.. तिरतेची ढाल दे
इनविती पंच प्रान.. जीवारात ताल दे
करपलं रानं देवा.. जळलं शिवारं
तरी नाही धीर सांडला...

खेळ मांडला....

अप्सरा आली - Apsara Aali

अप्सरा आली
गायक :- बेला शेंडे आणि अजय, अतुल


हो... कोमल काया.. की मोहमाया.. पूनव चांदन न्हाले,
सोन्यात सजले.. रुप्यात भिजले.. रत्नप्रभा तनु ल्याले..

ही नटली थटली...जशी उमटली.. चांदणी रंग महाली
मी यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली

अप्सरा आली.. इन्द्रपुरीतुनी खाली
पसरली लाली.. रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली.. चांदणी रंग महाली
अप्सरा आली.. पूनव चांदन न्हाली

हो...छबीदार सूरत देखनी , जनु हिरकनी.. नार गुलज़ार
छबीदार सूरत देखनी , जनु हिरकनी.. नार गुलज़ार
सांगते उमर कंचुकी , बोपुडी मुकी.. सोसते भार ,
शेलटी खुणावी कटी.. तशी हनुवटी.. नयन तलवार
ही रति मदभरली.. दाजी.. ठिनगी शिनगाराची
कस्तूरी दरवळली.. दाजी.. झुळुक ही वार्‍याची

ही नटली थटली...जशी उमटली.. चांदणी रंग महाली
मी यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली

अप्सरा आली.. इन्द्रपुरीतुनी खाली
पसरली लाली.. रत्नप्रभा तनु ल्याली
ती हसली गाली.. चांदणी रंग महाली
अप्सरा आली.. पूनव चांदन न्हाली

नटरंग उभा - Natarang Ubha

नटरंग उभा
गायक : अजय - अतुल आणि इतर

धुमकीट धुमकीट तदानी धुमकीट नट नागर
नट धुम नट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग

पख वाजते ता वाज झनन झंकार लेऊनी
स्त्री रूप भूलवी नटरंग नटरंग नटरंग

रसिक होऊ दे, दंग चढू दे, रंग असा खेळाला
साता जन्माची, देवा पुण्याई, लागू दे आज पणाला
हात जोडतो, आज आम्हाला, दान दे तुझा संग

नटरंग उभा... ललकारी नभा... स्वर ताल जाहले दंग - 2

हे कड कड कड कड बोल बोलती हुन्नर ही तालाची
अन् छुम छुम छनन साथ तिला या घुंगरांच्य़ा बोलाची
जमवून असा स्वर साज मांडतो हीच इनंती यावजी
हो कीरपेच दान द्यावजी हे यावजी - 3

ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला, थोर उपकार
तुज चरणी लागली वरणी, कशी ही करणी करू साकार
मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार
एकला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग

नटरंग उभा... ललकारी नभा... स्वर ताल जाहले दंग - 2

हे कड कड कड कड बोल बोलती हुन्नर ही तालाची
अन् छुम छुम छनन साथ तिला या घुंगरांच्य़ा बोलाची
जमवून असा स्वर साज मांडतो हीच इनंती यावजी
हो कीरपेच दान द्यावजी हे यावजी - ३